Brief Information of about Yogeshwari Devi, Ambajogai

श्री. योगेश्वरी देवी, थोडक्यात माहिती

श्री योगेश्वरी देवीचे अंबाजोगाई हे क्षेत्र मराठवाड्यातील तालुक्याचे गाव आहे. बालाघाट पर्वताच्या माथ्यावर वसलेले हे गाव मध्य रेल्वेच्या परळी वैजेनाथ या स्टेशनपासून २२ कि.मी. अंतरावर आहे. अंबाजोगाई हे गाव बीड जिल्ह्यात आहे. अनेक जिल्ह्यातून येथे येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची सोय आहे. अंबाजोगाई हे गाव समुद्र सपाटीपासून २००० फूट उंचीवर आहे. इथले हवामान समशीतोष्ण कोरडे ताजेतवाने ठेवणारे आहे. श्री. योगेश्वरी देवीचे घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांची रिघ लागलेली असते. योगेश्वरी देवी हि सर्वांचीच देवता आहे. व चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी आहे. श्री योगेश्वरीचे मंदिर अगदी शहराच्या मधोमध असून एस. टी. बस स्थानकापासून चालत दहा मिनिटाच्या अंतरावर आहे. ऑटोरिक्षा सुद्धा उपलब्ध आहेत. बाजारपेठेतल्या रस्त्याने गावच्या मधोमध आल्यावर जयवंती नदी दिसते. नदीच्या पलीकडे प्रथम दिसते ते श्री योगेश्वरी मंदिराचे दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार महाद्वाराचे दगडी बांधकाम पाहून वश्तुशात्रातील सुंदर नमुना पहावयास मिळतो. मंदिराच्या भोवती दोन परकोट आहेत. आतील परकोटाच्या मध्यभागी देवीचे सुंदर असे मंदिर आहे. दक्षिणाभिमुख महाद्वारातून प्रवेश केल्यावर समोर एक उंच दीपमाळ दिसते. अशीच दीपमाळ उत्तराभिमुख असलेल्या महाद्वारासमोर आहे व ती हत्तीच्या पायाच्या आकाराची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर गगनचुंबी वैभवशाली शिखर इतर चार छोटी शिखरे व हेमाडपंथी बांधकाम असलेले मंदिर आपल्या नजरेस पडते. मुख्य मंदिराला पूर्व व उत्तर दिशेने दरवाजे आहेत. आत मध्ये गाभाऱ्यात शेंदरी रंगाची ओंकार आकाराची नाक डोळे इद्यादी अवयव असलेली अंगाचा मुकुट कोरलेली केवळ कमरेपर्यंत भाग असलेली हि महन्मंगल ओंकाररूपी मूर्ती पाहून मनातल्या भावभक्तीला उधान येते.

प्रमुख ठिकाणे : योगेश्वरी मंदिर, मूळ जोगाई मंदिर, रेणुकामाता मंदिर, आद्यकवी मुकुंदराज समाधी, हत्तीखाना, दासोपंथ समाधी, बडा हनुमान मंदिर, नागनाथ मंदिर, बुट्टेनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, हेमाडपंथी श्री. खोलेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, बाराखांबी, काशी विश्वनाथ मंदिर, काळा मारुती खडकपुरा, सावता माळी मंदिर, मौलाली दर्गा.